कासोदा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शेतकरी कर्ज माफीसाठी चक्का जाम आंदोलन, दिले निवेदन.

Spread the love

एरंडोल :- कासोदा तालुका एरंडोल येथे शेतकरी कर्ज माफी साठी प्रहार जनशक्ती पक्ष कडून चक्का जाम आंदोलन कासोदा, पारोळा टी पाईंन्ट ला सकाळी ९ ते ११ या दरम्यान झाले या चक्का जाम आंदोलनात प्रमुख मागण्या शेतकरी कर्ज माफी, दिंव्याग पेंशन, कामगार, विधवा बगीणी यांच्या पेंशन इतर मागण्या मान्य पूर्ण झाल्या पाहिजेत या साठी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भर चक्का जाम आंदोलन करण्यात आले त्यात एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलिस स्टेशन अंतर्गत चक्का जाम आंदोलन घेण्यात आले

आंदोलनाला शेतकर्यां कडून चांगला प्रतिसाद मिळाला व कायदा सुव्यवस्था न बिघङता शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्ष एरंडोल यांच्या संयुक्त पध्दतीने हे आंदोलन पार पाडत प्रहार तालुका अध्यक्ष सुनील पाटील व काही प्रहर कार्यकर्ते यांना अटक व सुटका करण्यात आली प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनिल पाटील उमरेकर ज्ञानेश्वर महाजन, अनिल पाटील तालुका सरचिटणीस प्रहर, सुनिल दयाराम पाटील, सचिन पाटील, श्रीकांत आबा, बबलू महाजन, कल्याण पाटील, अँड जयेश पिलोरे, जयराम पवार सुनिल हरगुडे ,गोकुळ पाटील,छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील, रावसाहेब पाटील वरपडे इतर मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

आंदोलन करते व सपोनी यांच्यात किरकोळ शाब्दिक बाचाबाची प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली माहिती.

( सदर आंदोलन प्रसंगी का कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत हे आले त्यांनी आंदोलना प्रसंगी आंदोलन कर्त्यांना सांगितले की तुमच्या फोटो सेशन कार्यक्रम झाला असेल तर लवकर उठा यावर सुनील पाटील यांनी ताबडतोब उत्तर दिले की असे चुकीचे बोलू नका सदर आंदोलन हे बच्चू भाऊंनी सपूर्ण महाराष्ट्रभर केलेले आहे शेतकऱ्याच्या आंदोलनाला फोटोसेशन म्हटल्यामुळे आंदोलनातील कार्यकर्ते शेतकरी व स्वतः सुनील पाटील व सपोनी मध्ये किरकोळ बाचाबाची झाली की आम्ही फोटोसेशन साठी आलेलो नाहीत तुम्ही चुकीचे बोलू नका शेतकऱ्यांचा अपमान करू नका पूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन आहे. यावर सपोनी राजपूत यांनी सावरा सावर करत माझे तुम्हाला शंभर टक्के सहकार्य आहे असं बोलून आंदोलन करण्याचे मन धरून प्रकरण मिटवले. असे स्वतः प्रहार संघटनेचे एरंडोल तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितले

मुख्य संपादक संजय चौधरी