एरंडोल शहरातील खोल महादेव मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न…

Spread the love

एरंडोल : – शहरातील श्रीशिव भक्तांचे मोठे श्रध्दास्थान असलेल्या श्री खोल महादेव मंदीर येथे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा २९ जुलै पासुन मोठ्या उत्साहपुर्ण वातावरण पार पडत आहे. यात पुरातन स्थापीत जीर्ण मुर्तीचा तेजोलारण विधी, श्री गणेश, पार्वती माता, श्रीमहादेव नंदी महाराज या नुतन मुर्तीची एरंडोल शहरातुन भव्य शोभा यात्रा, श्रीगणेश पुजन, पुण्याहवाचन, ऋत्विकवरण, मातृका पुजन, मुख्यदेवता पुजन, सर्वतीभद्र मंडल पुजन, वास्तुमंडळ पुजन, नवग्रह पुजन, योगीनी पुजन, क्षेत्रपाल पुजन, रूद्र कलश पुजन, जलाधिवास, स्थापीत, देवांचे हवन, स्थापित देवतांचे सायंपुजन, नैवेद्य आरती, नुतन मुर्तीना धान्यधिवास, स्थापित देवतांचे प्रातः पुजन, मुख्यदेवतांना दशविधी स्नान, अभिषेक, मुख्यदेवतांचे हवन, पुर्णाहुती दशदिकपाल पुजन, क्षेत्रपाल बलीपुजन, नैवेद्य, महाआरती या कार्यक्रमांनी एरंडोल नगरी ही शिवभक्तीत मंत्रमुग्ध झाली होती.

या पवित्र व उत्साहपुर्ण सोहळ्यातील आजच्या महाप्रसाद सोहळ्यास मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी उपस्थित राहत, देवाधिदेव श्री महादेवा चरणी नतमस्तक झाले व महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांतुन व आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतुन या श्री खोल महादेव मंदीर परिसरात बांधकाम करण्यात आलेल्या १५ लक्ष रूपयांचा सभामंडपाचा देखील लोकार्पण सोहळा आमदार मा.आबासाहेबांचा शुभहस्ते पार पडला.

या जिर्णोध्दारासह सभामंडपाचा बांधकामाने मंदीराची शोभा वाढली, या ठिकाणी दैनंदिन येणाऱ्या भाविक-भक्तांना या सभामंडप बांधकामाचा दैनंदिन लाभ होणार आहे. या मंदीरातील आयोजित कार्यक्रमांसाठी या सभामंडपाचा माध्यमाने सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल एरंडोल शहरवासियांतर्फे मा.आबासाहेब व आमदार मा.अमोलदादा पाटील यांचे आभार मानले.

याप्रसंगी धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, पारोळा तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, नगरसेवक आनंदभाऊ दाभाडे, छायाताई दाभाडे, शहरसंघटक मयुर महाजन, प्रवराज पाटील,कुणाल पाटील यांचेसह भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी