जामनेर(प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट २०२५ रोजी “महसूल दिन” आणि १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत “महसूल सप्ताह २०२५”साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट महसूल विभागाच्या सेवांची जनजागृती, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव तसेच नागरिकांसाठी उपयुक्त योजना राबविणे हे आहे.
जामनेर तहसील कार्यालयाच्या वतीने या सप्ताहात पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे –
१ ऑगस्ट – “महसूल दिन” साजरा व उद्घाटन समारंभ. उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी गौरव आणि विविध प्रमाणपत्रांचे वितरण.
२ ऑगस्ट – शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीच्या वस्तीगत अतिक्रमणांचे नियमन करून पात्र कुटुंबांना पट्टे वाटप कार्यक्रम.
३ ऑगस्ट – पाणंद/शेतरस्त्यांची मोजणी करून अतिक्रमणमुक्त करणे व वृक्षलागवड.
४ ऑगस्ट – “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” आयोजन, विविध शासकीय सेवा व लाभ वितरण.
५ ऑगस्ट – विशेष सहाय्य योजनेंतर्गत डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेट व डीबीटी सुनिश्चित करणे.
६ ऑगस्ट – शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटवून ती सरकारजमा करणे किंवा नियमन करणे.
७ ऑगस्ट – एम.सॅन्ड धोरणाची अंमलबजावणी आणि महसूल सप्ताहाचा समारोप समारंभ.
संपूर्ण सप्ताहात विविध शिबिरे, जनजागृती उपक्रम, नागरिक मार्गदर्शन कक्ष (हेल्प डेस्क), तसेच ऑनलाईन सुविधांची माहिती देण्यात येईल. तहसीलदार कार्यालय, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
जामनेर तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील नागरिकांना आवाहन करते की त्यांनी या सप्ताहातील कार्यक्रमांना उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शासनाच्या कल्याणकारी उपक्रमांचा लाभ घ्यावा. असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पत्रकार परिषदेत केले या वेळी निवासी नायब तहसीलदार सतीश इंगळे, शिवदे मॅडम, पुरवठा निरीक्षक सुर्वे आदी उपस्थित होते.