जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू

Spread the love

जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील बेटावद खुर्द येथील एका तरुणाचा काही जणांच्या टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर असे की सुलेमान रहीम खान (रा.बेटावद खुर्द वय-२०) या तरुणाला जामनेर येथे काही तरुणांच्या टोळक्याकडून जीवघेणी मारहाण करण्यात आली. तश्या अवस्थेत घरी पोहचला व त्याने आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. नंतर त्याला मारहाणीचा असहय त्रास झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला.दरम्यान समाज बांधवांनी मयत सुलेमानला मृत्यू कारणीभूत असलेल्या संशयीत घटकांवर कायदेशीर व कठोर कारवाई होण्यासाठी ठिय्या आंदोलन केले.पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी यावेळी माहिती दिली. घटनेत १२ संशयिताचे नावे तपासा दरम्यान समोर आले असून. त्यातील दोन संशयीत आरोपीना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी पत्रकारांना दिली.तसेच नागरिकांनी सोशल मीडिया वरील अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन त्यांनी यावेळी केले

मुख्य संपादक संजय चौधरी