एकही कॅफे अधिकृत नाही/कॅफे उदयम आधार प्रकारात येतो का ?
जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील बेटावद खुर्दच्या २०वर्षीय सुलेमान रहीम खाँ पठाण याचा शहरातील ब्रँड कॅफे येथे दहा ते बारा जणांच्या समाज विघातक घटकाच्या टोळक्याकडून जीवघेणी मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत सुलेमानचा मृत्यू झाला.या अशा घटनेमुळे शहरासह परिसरात सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परंतु पोलीस प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळली.परंतु यातील मूळ मुद्दा
शहरात चालू असलेले अनधिकृत कॅफे
दरम्यान शहरातील अनधिकृत कॅफेचे फोफावत चाललेल्या प्रकारचे प्रसार माध्यमातूनही वाचा फोडन्याचे काम चालूच होते.परंतु आपल्या पाठीशी राजकीय वरदहस्त असल्याच्या अविर्भावात ह्या कॅफे चालकांची मुजोरी वाढली.यात सुलेमानला आपला जीव गमावावा लागला. घटनेनंतर लागलीच पोलीस प्रशासनाने गंभीर भूमिका घेत.त्या सर्व अनधिकृत कॅफे चालकांना कायदेशीर कठोर कारवाईचा इशारा देत. त्या कॅफेना टाळे लावण्याची धडक कारवाई केली.पोलीस प्रशासनाने तर ही कारवाई केली परंतु याआधी महत्वाची भूमिका आहे ती नगर परिषदेची नगर परिषद प्रशासनाला या कॅफें विषयी पूर्व कल्पना नव्हती का ? हा प्रश्न उपस्थित होतो. किंवा मग पूर्व कल्पना होती तर नगर परिषद प्रशासनाने त्या कॅफें चालकांना कायदेशीर नोटीस का पाठवल्या नाहीत.किती कॅफे चालकांना नगर परिषदेकडून ना हरकत मिळाला आहे.याची नोंद नगर परिषद प्रशासनाकाडे आहे का ? किंवा ते कॅफे शासनाच्या नेमून दिलेल्या चौकटीच्या निकषानुसार पात्र आहे का हे कोण बघणार.तसेच कारवाई दरम्यान एका कॅफेत उदयम आधारचे प्रमाणपत्र भिंतीवर लावलेले आहे. उद्यम आधार यात कॅफेला मान्यता आहे का आणि असेल तर मग या कॅफेंमध्ये जे प्रकार चालतात त्यालाही मान्यता आहे का हा प्रश्न आहे.