जामनेर(प्रतिनिधी):- तालुका दिवाणी न्यायालयाच्या आवारात राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तसेच थकबाकी वादांचे तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्यासाठी विशेष कार्यवाही करण्यात आली.
यावेळी मुख्य न्यायाधीश,दिवाणी न्यायालय जामनेर, तहसीलदार जामनेर तसेच जामनेर वकील संघाचे पदाधिकारी मान्यवर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. याशिवाय सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत नायब तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी यांसह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार थकबाकीदार खातेदार तसेच विविध प्रकरणांमध्ये संबंधित पक्ष प्रत्यक्ष न्यायालयीन आवारात उपस्थित झाले. लोक अदालत या उपक्रमात वाद मिटविण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवून अनेक प्रकरणांचा मैत्रीपूर्ण तोडगा काढण्यात आला.
लोक अदालत हा न्याय मिळविण्याचा जलद, सुलभ आणि स्वस्त मार्ग आहे. यामध्ये वादग्रस्त दोन्ही पक्षांना न्यायालयाच्या मदतीने तडजोडीचा मार्ग काढता येतो. त्यामुळे न्यायप्राप्तीची प्रक्रिया गतीमान होते तसेच सर्वसामान्य नागरिकांचा वेळ व खर्चही वाचतो.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य
• न्यायालय, वकील संघ व महसूल प्रशासन यांचे एकत्रित प्रयत्न
• थकबाकीदार खातेदारांना दिलासा
• मैत्रीपूर्ण तडजोडीद्वारे प्रकरणांचा निपटारा
• नागरिकांमध्ये कायदेशीर जनजागृती
या राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमामुळे न्यायालयीन प्रकरणे कमी होऊन न्यायदान प्रक्रिया जलद झाली असून, नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला होतो.