वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन

Spread the love

वावडदे ता. जळगाव दि.१३ रोजी गोरी उद्योग समूह येथे एम. जे. महाविद्यालय, जळगाव – द्वितीय वर्ष बी.कॉम विद्यार्थींचा उपक्रम

जळगाव :- एम. जे. महाविद्यालय, जळगाव येथील बी.कॉम द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी “कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रॅम (CEP)” अंतर्गत म्हसावद व वावडादे या गावांना भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना डिजिटल बँकिंग, यूपीआय व्यवहार व सायबर फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी सोप्या भाषेत मोबाईलद्वारे सुरक्षितपणे व्यवहार कसे करावेत, संशयास्पद लिंक व संदेशांपासून कसे सावध राहावे, तसेच इंटरनेट बँकिंग करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली.

या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः वावडादे येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या स्पष्टीकरणामुळे गावकऱ्यांना डिजिटल व्यवहाराबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास मिळाला.

या उपक्रमाचे मार्गदर्शन समन्वयक प्रा. नितीन चौधरी सर यांनी केले

मुख्य संपादक संजय चौधरी