
एरंडोल :- दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथील आयुष्यमती सिंधुबाई आधार सरदार यांची नाती तसेच आयुष्यमान संदीप आधार सरदार व आयुष्यमती करुणा संदिप सरदार यांची सुकन्या कु.अद्विका(साऊ)चा प्रथम वाढदिवस स्त्री जन्माचे स्वागत म्हणून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हॉटेल कृष्णा येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यांनी या प्रथम वाढदिवसास मुलींच्या जन्माला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या कन्या बचाव जागर कार्यक्रमात रूपांतरित केले. सदर कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या माध्यमातून मुलीचा जन्म किती आवश्यक आहे आणि मुलीच्या जन्माला प्रतिष्ठान मिळवून देणे का गरजेचे आहे यावर प्रबोधन करण्यात आले. तसेच मुली मुलांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नसून समाजाने मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवावा यावर सुद्धा प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतातील पहिली स्त्री शिक्षिका आई सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व पुष्प वाहून करण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना महापुरुषांची चरित्रे व संतांची चरित्रे असलेली प्रेरणादायी पुस्तके मान्यवरांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष तथा उत्राण माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रा.भरत शिरसाठ सर, खडकेसीम येथील माजी सरपंच राजेंद्र विठ्ठल पाटील, महेंद्रसिंग पाटील विद्यालय खडकेचे मुख्याध्यापक मा. आर. टी. पाटील सर, मा.प्रकाश तामस्वरे सर, मा.किसन तामस्वरे साहेब, मा.भैयासाहेब सोनवणे सर, हॉटेल कृष्णाचे मालक मा. कृष्णा शेठ व समस्त सरदार परिवारावर प्रेम करणारे सर्व खडके सिम खुर्द तसेच गणेश नगर(तांडा)चे आप्तेष्ट नातेवाईक,गावातील व पंचक्रोशीतील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मा. भरत शिरसाठ सर यांनी प्रबोधनपर विचार व्यक्त केले. जळगाव जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी होत असून एक हजार मुलांमागे 840 मुली असल्याचे सांगत मुलीच्या जन्माचे स्वागत संदीप सरदार यांच्यासारखे करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मा. राजेंद्र विठ्ठल पाटील व मा. आर.टी.पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रंगी सरदार दांपत्याचे अभिनंदन करून कु.अद्विका(साऊ)यास शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. प्रकाश तामस्वरे सर यांनी केले.