अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगाव : अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताच्या प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रांत सचिव व जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांच्या आयोजनात जळगाव व नंदुरबार जिल्ह्याची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची एकमताने फेरनियुक्ती करण्यात आली. बैठकीस प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी, प्रांत उपाध्यक्षा व नंदुरबार जिल्हाध्यक्ष वंदना तोरवणे, प्रांत सचिव व जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, जिल्हा पालक विलास लेले, प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे, कार्यकारिणी सदस्या ॲड. भारती अग्रवाल, जिल्हा संघटक ॲड. सुभाष तायडे, जगन्नाथ तळेले, मकसूद बोहरी, सौ. कपिला मुठे तसेच नंदुरबार जिल्ह्याचे प्रा. डी. सी. पाटील, रणजीतसिंग राजपूत पाटील आदींसह पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी जळगाव जिल्ह्याच्या प्रस्तावित कार्यकारिणीस मान्यता देत जळगाव जिल्हाध्यक्षपदी ॲड. सुभाष तायडे, उपाध्यक्षपदी सतीश देशमुख व दिनेश तायडे, तर सचिवपदी रमेश सोनवणे यांची नियुक्ती जाहीर केली. अन्य नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचेही स्वागत करण्यात आले.
प्रांताध्यक्ष औटी यांनी संघटनेचा कार्यकर्ता हा समर्पणभावनेने कार्य करणारा असावा, असे सांगत संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची रूपरेषा मांडली. त्यांनी अलीकडे अमळनेर येथे पार पडलेल्या परिचय मेळाव्याचा संदर्भ देत प्रत्येक जिल्हा व तालुक्यात अभ्यासवर्ग आणि त्रैमासिक कार्यआराखडा तयार करून कार्यास गती देण्याचे आवाहन केले. तसेच श्री क्षेत्र ओझर येथे दि. २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या अभ्यासवर्गास उपस्थित राहण्याचेही आवाहन त्यांनी केले. बैठकीदरम्यान विनायक महाजन यांच्या फेरनियुक्तीबद्दल तसेच नवनियुक्त जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक संजय चौधरी