
एका पाच मुलांची आई असलेल्या महिलेने तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत आठ महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एक धक्कादायक कृत्य केलं. खरंतर, संबंधित महिलेच्या मते, त्या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. महिलेला तिच्या पतीकडे परत जायचं होतं, पण तिच्या प्रियकराने तिला परत जाण्यापासून अडवलं असल्याचं तिने सांगितलं. संबंधित घटना बिहारच्या भागलपुरमध्ये घडल्याची माहिती आहे.
महिलेने प्रियकरावरच केले आरोप…
महिला याबाबत सांगताना म्हणाली की, “आधी त्या तरुणाने माझा मोबाईल नंबर घेतला आणि त्याने मला फोन केल्यानंतर मी त्याला ओरडले सुद्धा. पण त्याने माझं अजिबात ऐकलं नाही आणि मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर, मी माझ्या पतीला सोडून त्या तरुणासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मी पाच मुलांची आई आहे आणि मला माझ्या पतीकडे परत जायचं आहे. पण, माझा प्रियकर मला तसं करण्यापासून अडवत आहे.”
संबंधित महिलेचे तिच्या पतीसोबत बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. दरम्यान, तिची ओळख 20 वर्षांनी लहान असलेल्या एका तरुणाशी झाली. कालांतराने, दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि कुटुंब तसेच समाजाची पर्वा न करता त्यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरूवात केली. जवळपास 8 महिने ते एकमेकांसोबत राहिले. मात्र, काही काळानंतर महिलेला तिच्या प्रियकराचं वागणं आवडेनासं झालं. तो नेहमी तिला घरात बंदिस्त ठेवायचा. याच कारणाला वैतागून संबंधित महिला तिच्या प्रियकराच्या कुटुंबियांकडे गेली आणि तिने तिथे धिंगाणाच घातला. त्या तरुणाने महिलेला लग्नाचं आश्वासन देऊन तिची फसवणूक केली असल्याचा आरोप तिने केला.

घटनेच्या वेळी, परिसरातील लोकांची गर्दी जमली. त्यावेळी, संबंधित महिला तिच्या लिव्ह-इन-पार्टनरसोबत भररस्त्यात वाद घालत होती. खरंतर, ती आपल्या पतीकडे जात होती, मात्र तिचा प्रियकर प्रेयसीला असं करण्यापासून थांबवत होता. ती माहिला रडत आणि हात जोडत प्रियकराकडे विनवणी करत होती. परंतु, यावर तरुणाने तिला मारहाण केली आणि म्हणाला की, “मी तुला कुठेच जाऊ देणार नाही.” त्यानंतर, तिथल्या स्थानिकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. संबंधित महिलेचं नाव मीना कुमारी असून आरोपी तरुणाचं नाव अनुराग असल्याची माहिती आहे. मीनाने याबद्दल तक्रार करताना सांगितलं की, “एका वर्षापूर्वी मी माझ्या नणंदेच्या घरी जात होते. तेव्हा मला वाटेत अनुराग भेटला. त्यावेळी, अनुरागने आपला फोन खराब झाला असून एक कॉल करायचा आहे, असं मला सांगितलं. त्याने माझ्या मोबाईलवरुन फोन केला. त्यानंतर, तो नेहमी माझ्या फोनवर कॉल करु लागला. त्यावेळी, मी त्याला ओरडले आणि पुन्हा फोन करु नको, अशी धमकी सुद्धा दिली. परंतु, त्याने माझ्या पतीला आमचं अफेअर सुरू असल्याचं खोटं सांगण्याची धमकी दिली नाहीतर, पतीला मारून टाकेन, असं सुद्धा सांगितलं. याच भितीमुळे मी त्याच्या जाळ्यात अडकले. “
आरोपी प्रियकराने काय सांगितलं?
तसेच प्रियकर अनुरागच्या म्हणण्यानुसार, त्याचं मीनावर प्रेम असून ते दोघे वर्षभर एकमेकांसोबत राहिले. मीनाच्या पतीने सुद्धा तिच्या प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि त्यावेळी, मीनाने अनुरागसोबतच राहणार असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं.
पीडितेच्या पतीचं म्हणणं
याशिवाय, महिलेच्या पतीने या प्रकरणाबाबत सांगितलं की मला फक्त माझी पत्नी हवी आहे. कारण, मुलांना सुद्धा तिची गरज आहे. मला तिच्यासोबतच राहायचं आहे. सध्या, विवाहबाह्य संबंधामुळे झालेल्या या प्रकारामुळे परिसरात बऱ्याच चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय.
