एरंडोल : विश्वाला शांती, करुणा, समता आणि मानवतेचा संदेश देणारे महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरातील भीमनगर येथे बुद्ध जयंती समितीची बैठक बुधवार, दि. २९ एप्रिल रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडली.बैठकीत सर्वानुमते सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची बुद्ध जयंती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी बंटी सरदार, खजिनदारपदी रोहित गायकवाड तर कार्याध्यक्ष म्हणून सागर सरदार, सचिन बोरसे, आकाश इंगळे आणि उमेश बोरसे यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश शिंदे, नितीन बोरसे, उमेश भाऊ शिंदे, रवी बोरसे, अभिषेक शिंदे, संघरत्न गायकवाड, लखन बनसोडे, प्रवीण बाविस्कर, अमोल शिंदे, मनोज बोरसे, राहुल बोडरे, प्रवीण खैरनार, दिनेश बोरसे, मनोहर बोडरे, जितेंद्र बोडरे आदींसह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धांच्या विचारांचा समाजात अधिकाधिक प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.बैठकीत बुद्ध जयंतीनिमित्त विविध सामाजिक व धम्म दानाचे कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार दि. १ मे रोजी सकाळी खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, समाजात बंधुभाव आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश यातून दिला जाणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता एरंडोल शहरातून भव्य बौद्ध शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा भगवान बुद्धांच्या शांती, करुणा आणि धम्माच्या विचारांचा संदेश जनमानसात पोहोचविणारी ठरणार आहे. यात्रेनंतर रात्री ९ वाजता सामूहिक भोजनाचा कार्यक्रम होणार आहे.“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या बुद्धांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सर्व कार्यक्रम शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.






