गॅस एजन्सीवर सशस्त्र दरोडा; साडे चार लाखाची चोरी.

Spread the love

चाळीसगाव – प्रतिनिधी :- शहरातील एका गॅस एजन्सीत भामट्याने दरोडा टाकत चाकूचे धाक दाखवून रोकडसह एकूण ४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील शांतीनगर येथील अशोक किसनचंद छाबडीया (वय ५८) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून ते मालेगाव रोडवरील एच. पी. गॅस एजन्सीत कामाला आहेत. या एजन्सीत दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसऱ्या दिवशी बॅकेत भरणा करण्याचे काम छाबडीया हे करीत असतात. दरम्यान २५ एप्रिल रोजी रात्री रात्री ८:३० वाजताच्या सुमारास छाबडीया हे नेहमीप्रमाणे डिलीव्हरी बॉयकडून पैसे घेऊन मोजत होते. तेवढ्यात दुकानाचा शटर वर करून भावेश मनोज माखोजा (वय – २०-२२ अंदाजे) रा. उल्हासनगर हा चाकू घेऊन मध्ये आला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून पैसे दे अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ३,६५,००० हजार रोकड व ७५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच. १९ डीएक्स२९१२) असे एकूण ४,४०,००० रूपये घेऊन पळ काढला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून छाबडीया यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भावेश मनोज माखोजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.

टीम झुंजार