फेसबुक पोस्ट करत ‘या’ भाजप महिला नेत्याची आत्महत्या

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बांदा या ठिकाणी एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची सून आणि भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्या असलेल्या महिलेने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पती-पत्नीमधील वाद आणि अंतर्गत विवाद यामुळे हि आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे. हि घटना उघडकीस आल्यानंतर मृत महिलेचा पती फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिह्याचे एसपी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली.

श्वेता सिंह गौर असे आत्महत्या करणाऱ्या भाजपच्या महिला नेत्याचे नाव आहे. त्या बांदा येथील जसपुरा भागातील जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी आयपीएस राज बहादूर सिंह यांच्या सून होत्या. सिंह यांच्या घरी दोन्ही मुलगे आणि सून राहत होते. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असणाऱ्या श्वेता यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या आत्महत्येची पुसटशी कल्पना दिली होती. श्वेता सिंग गौर या पती दीपक सिंग गौरसोबत सासरी राहत होत्या. पती-पत्नी दोघेही भाजपशी संबंधित आहेत. या दोघां पती – पत्नींमध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून भांडण सुरू होते. घटनेच्या दिवशीसुद्धा या दोघांमध्ये भांडण झाले होते. याच वादातून श्वेता सिंह यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी श्वेता यांनी आदल्या दिवशी फेसबुकवर एक पोस्टही केली होती, ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते कि, ‘जखमी नाग आणि सिंहीण, अपमानित महिलेला घाबरलं पाहिजे.’ श्वेता सिंह गौर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी श्वेता सिंह यांचा मोबाइलसुद्धा ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. श्वेता सिंग गौर यांनी मृत्यूच्या 20 तास अगोदर लिहिलेली फेसबुक पोस्ट वाचून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी तसेच गुन्हा दाखल करून पुढील कारवाईत सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अभिनंदन यांनी दिली आहे.

टीम झुंजार