जळगावच्या दाेन तरुणांचा गोदावरीत बुडून मृत्यू

Spread the love

नाशिक प्रतिनिधी :- नाशिक शहरात कामानिमित्त आलेल्या जळगावच्या दोघा तरुणांचा गोदावरीत दुचाकीसह बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. गणेश सुरेश निकम (२३) व योगेश दुसाने (२४, रा. जळगाव) असे बुडालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रात्री ११ वाजेच्या सुमारास दोघे तरुण दुचाकीने आडगावकडून द्वारकाकडे दुचाकीने येत असताना कन्नमवार ब्रीजजवळ पात्रालगत त्यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह नदीपात्रात पडले. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी रात्रीच शोधकार्य राबवत दोघांचे मृतदेह बाहेर काढले

टीम झुंजार