लतिका बोंडे लोकनियुक्त संरपच यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी रावेर
रावेर :-
तालुक्यातील कुंभारखेडा गावातील लोकनियुक्त संरपच निवडणूक ही लक्षवेधी ठरली होती.कारण वय वर्ष (६०) साठच्या पारा असलेल्या श्रीमती लतिका बोंडे ह्या केवळ आपल्या हातून जनसेवा घडावी ह्या प्रांजळ हेतू निवडणूक लढवित होत्या. हि निवडणूक जवळपास एकतर्फीच झाली कारण कुंभारखेडा गावकऱ्यांनी लता बोंडे ह्यांना भरभरून मतांचा पाऊस त्यांच्या पदरात टाकला, म्हणजे गावांचा विकास ह्यालाच समस्त गावकऱ्यांनी अप्रतिम एक प्रकारे शंभर टक्के मतदान रुपी पाठिंबा दिला.यामुळे लतिका बोंडे यांच्या वर जबाबदारी आणखी वाढली कारण मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही.म्हणून लोकनियुक्त संरपच पदी विराजमान झाल्यावर लगेचच त्यांनी कुंभारखेडा गावातील आजपर्यंत रखडलेल्या कामांची सविस्तर माहिती संबंधितांकडून घेऊन ते कामे कशी तातडीने पूर्णत्वाकडे नेता येतील यांची जबाबदारी, खबरदारी स्वतः घेतली आणि गावातील मुलभूत सुविधा, नळाचे पाणी, गटारीचे बांधकाम, पार्थ दिवे, गल्ली बोळात काॅक्रीटकरण , महिला संडाशी नवीन बांधकाम, बालगोपाल साठी अंगणवाडी बांधकाम, मराठी मुलांची शाळा संरक्षण भिंत, सुशोभीकरण, उप आरोग्य केंद्र दुरुस्ती, कोरोना काळात गावात ऑक्सिजन सिंलेण्डर सुविधा उपलब्ध करून जळगाव जिल्ह्यात प्रथमच ऐतिहासिक ठोस उपाययोजना केली,

तसेच सर्वधर्म समभाव याम्हणी प्रमाणे तडवी समाज दफन भूमीत पेव्हर ब्लॉक बसविले, बौद्ध समाज स्वागत गेट जवळ विशेषकरून काॅक्रिटकरण करून घेतले, गावविहीरीवर संरक्षण आवरण बसवून कोणत्याही परिस्थितीत अनर्थ होणार नाही याची दक्षता घेतली, रामनगर येथे आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या निधीतून पेव्हर ब्लॉक बसविले, नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करून एक नवीन वास्तू प्रशासकीय सेवेत सामावून घेतली,
त्याचप्रमाणें महिला, पुरुष,बाळ गोपाळ यांच्या संपूर्णपणे मुलभूत सुविधा,गरजा, समस्या निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले, त्याचबरोबरीने पशुसंवर्धन साठी ही पशुवैद्यकीय दवाखाना नवीन बांधकाम करून घेतले, याहूनही पुढे म्हणजे श्वपेटी उपलब्ध करून स्वर्ग रथ ही लोकार्पण केले.

अशा प्रकारे पुरुषांना ही हेवा वाटावा… तरुणांना लाजवेल अशी स्फूर्ती, प्रेरणा दायी ईश्वरी सेवा म्हणजे जनसेवा ह्या कार्याची महती श्रीमती लतिका बोंडे लोकनियुक्त संरपच कुंभारखेडा यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.हयाच अष्ट पैलू जनहितार्थ कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्रीमती लतिका बोंडे लोकनियुक्त संरपच कुंभारखेडा यांना समाजभूषण पुरस्काराने जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव महापौर जयश्री महाजन, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष गुलाबराव देवकर , जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, वसंतराव मुंडे, प्रविण सपकाळे, यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टीम झुंजार