झुंजार । प्रतिनिधी
शिरपूर :- आज पवित्र रमजान ची नमाज़ दोन वर्षा नंतर कब्रस्तान ईदगाह मध्ये मोठ्या आनंदाने शिरपुर शहराचे तमाम मुस्लिम लोकांनी नमाज़ पठन केली. कमीत कमी दोन हजार लोकांची उपस्थिति ईदगाह मध्ये होती.
रमजान ईद निमित्त अल्पसंख्यांक विकास हक्क फाउंडेशन या सामाजिक संघटने मार्फत शहरात असलेले गोर गरीब लोकांना अन्न धान्य वाटप करण्यात आला.
वाटपाच्या कार्यक्रमात कमीत कमी शभंर लोकांना अन्न धान्य कीट देण्यात आला.
या प्रसंगी शिरपुर शहराचे पोलीस निरीक्षक माननीय प्रवीण देशमुख साहब, अप्पर पोलीस निरीक्षक गणेश फड़ साहब, माजी नगरसेवक नुरखान काज़ी साहब, जमीयत उलेमा ए हिंद चे ता. अध्यक्ष मौलाना अकरम ईशाती साहब, राजू भाई शेख, हाजी फिरोज काज़ी साहब,
ए. व्ही. एच. एफ. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सलमान काज़ी, उपाअध्यक्ष मुस्तुफा बोहरी, सचिव आकीब शाह, सोहेल खाटीक, ता. अध्यक्ष जाकिर तेली, उपाध्यक्ष इरफान मनियार, शहराध्यक्ष कामिल शेख, सिद्दीक सर, लईक सर, मुबीन शेख, रिज़वान शेख, आवेश सैय्यद, जुनेद खान, आसीफ तेली, आरिफ मलिक, आबिद शेख या मान्यवरांची उपस्थिति होती.