मुलाच्या आत्महत्ये नंतर पित्यानेही केली आत्महत्या ; यावल येथील घटना

Spread the love

यावल,प्रतिनिधी : – पोटच्या मुलाने काही दिवसापूर्वीच आत्महत्या केली मुलाच्या अकाली मृत्यूने दुःखात बुडालेल्या पित्याने देखील टोकाचं पाऊल उचलत नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज यावल शहरातील श्रीराम नगरात अक्षय तृतीयेच्या दिवशीच घडली. सदर घटनेने घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येतं आहे.याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रामचंद्र पंडित मेढे (55) असे मयताचे नाव आहे.

मुलाच्या मृत्यूने पित्याला नैराश्य…


यावल शहरातील सातोद रस्त्यावरील श्रीराम नगरात गतवर्षी कन्हैया रामचंद्र मेढे (28) या तरुणाने राहत्या घरात छताच्या अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला होता. मुलाच्या अकाली जाण्याने वडील रामचंद्र पंडीत मेढे हे सतत नैराश्यात होते व त्यांनीदेखील अक्षय तृतीया सणाच्या दिवशी घरात छताच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आज दि.3 मे मंगळवारी सकाळी उघउकीस आले.

अक्षयतृतीय सणाच्या दिवशी मेढे कुटुंबावर दुखा:चा डोंगरच कोसळला. या प्रकरणी यावल पोलिसात गोकुळ मेढे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास प्रभारी अधिकारी आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.

टीम झुंजार