जळगाव :- गावठी पिस्तूल बाळगून दहशत पसरवणाऱ्या संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडील वीस हजार रुपये किंमतीची पिस्टल जप्त करण्यात आली. या प्रकरणी रामानंद पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना शहरातील पिंप्राळे परिसरात एक इसम गावठी पिस्तूल बाळगून दहशत पसरवीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी जालिंदर पळे, सहा पोलीस निरीक्षक प्रितमकुमार पिताबर पाटील, विजय शामराव पाटील यांचे पथक तयार करून त्यांना रवाना केले.
आरोपी निलेश ऊर्फ सुपडया चंद्रकांत टाकूर ( वय २७ ) मिळून आला असता त्याचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती कमरेला एक २०,००० रु. किमंतीचा गावठी पिस्तोल मिळून आल्याने सदर गावटी पिस्तोल जप्त करून रामानंदनगर पोलीस स्टेशन फिर्यादी दिली. त्यानुसार अधिनियम क.३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.