जळगाव ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील शिरसोली येथील एका अल्पवयीन मुलीला गावातील संशयित तरूणाने फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिडीत मुलीचे वय सोळा वर्षे पाच महीने आहे मुलीच्या पित्याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मगन मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एक मे रोजी रात्री आठ वाजेपासून पिडीत मुलगी व संशयित आरोपी तरुण घरातून निघून गेले आहेत.
मुलीचा सर्वत्र शोध घेऊनही.ती.आढळून न आल्याने आज हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले