
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) :– चोरीच्या दोन मोटारसायकलींसह संशयित आरोपीला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रांजणगाव येथील अलीम कुतुबुद्दीन टकारी (वय-३७) यांची एमएच १९ डीएक्स ६२१७ क्रमांकाची मोटारसायकल ३ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितआरोपी रतन दगडू अहिरे (वय-४१ , रा. रांजणगाव ) याने मोटारसायकल चोरी केल्याची माहिती पो नि संजय ठेंगे यांना मिळाली.पो उ नि लोकेश पवार, सहायक फौजदार राजेंद्र साळुंके, पोहेकॉ नितीन सोनवणे, शंकर जंजाळे, मनोज पाटील, संदीप माने, संदीप पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी रतन अहिरे याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. आरोपी रतन अहिरे यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नितीन सोनवणे करीत आहेत.





