पूर्णा प्रतिनिधी सय्यद कलीम)दि…. मागील काही दिवसापासून संपूर्ण राज्याचा नवीन मायक्रो रोगाचा फैलाव होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी निर्बंध लादले आहेत परंतु सध्या मात्र परभणी जिल्ह्यामध्ये ना तोंडाला मास्क ना सोशल डिस्टंसिग पाळली जाते. त्यामुळे प्रादुर्भाव अधिकच गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परभणीचे जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी मागील चार दिवसापूर्वी आदेश काढले असून आगामी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाय सुचवले आहेत परंतु यावर उपाय सुचविण्याची अंमलबजावणी नागरिकांच्या वतीने केली जात असल्याचे चित्र रविवारी पहावयास मिळाले. पूर्ण शहरांमध्ये आणि नागरिक धावत आहेत तोंडाला मास्क न लावता शहरातील भाजीपाला विक्रेते, हॉटेल विक्रेत्यांकडून नियमांची पायमल्ली सुरू आहे. त्यामुळे तिसरी लाट अधिकच गडद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तसेच रविवारी नांदेड येथून परभणी कडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये तुफान गर्दी दिसून आली,यातील एकाही प्रवाशांच्या तोंडाला मास्क नव्हता त्यामुळे तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणे हे नागरिकांसाठी घातक ठरू शकते. रविवारी दिवसभर अनेक भागांमध्ये फेरफटका मारला असता नागरिकांना आगामी लाटेचा कुठलाही धोका जाणवत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे, एकीकडे रेल्वे राज्यमंत्री रेल्वेच्या नवीन गाड्यांचा शुभारंभ करीत आहेत परंतु नांदेड,परभणी,हिंगोली जिल्ह्यात मात्र कुठलीच नियम पाळताना दिसत नसून ही लाट सर्वांसाठी सुनामी असल्याचे बोलले जात असून परभणी जिल्ह्यात मात्र नागरिकांच्या वतीने कुठलाच नियम पाळत नसल्यामुळे आगामी काळात लॉकडाउन हाच पर्याय असल्याचे दिसून येत आहे