अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवक ठार तर दुसरा जखमी

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी :- धरणगाव शहरातील संजय नगर येथील रहिवासी श्री.आण्णा ज्ञानेश्वर (नामदेव) महाजन व प्रदीप विक्रम पाटील यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडस देत तेथून पोबारा केला.


सविस्तर वृत्त असे की दि.६ रोजी प्रदीप विक्रम पाटील वय ३२ व आण्णा ज्ञानेश्वर (नामदेव) महाजन हे वय २४ हे दुपारी एरंडोल येथे कामा निमित्ताने जात होते. त्यासाठी मित्र गोपाळ महादू माळी रा.धरणगाव संजय नगर याच्या कडे दुचाकीची मागणी केली असता युनिकॉन होंडा MH19CP4419 ही त्यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर सदरहू दोन्ही मित्र आपल्या कामा निमित्त एरंडोल जाण्यास निघाले असता धरणगाव-एरंडोल रस्त्यावरील हिरा इंटरनॅशनल स्कूल येथे अज्ञात वाहनाने मागून धडस देत तेथून पळ काढला.


प्रसंगी प्रदीप हा दुचाकी चालवत होतो तर अण्णा महाजन हा तरुण मागील बाजूस बसून होता. धडस जोरदार असल्या कारणाने दोन्ही मित्र बाजूला असलेल्या चारीत फेकले गेले यात प्रदीप यास हात ,पाय व छातीस मार बसला असून आण्णा महाजन यांस डोक्यास जबर मार लागल्या मुळे रक्तस्राव होत होता. मिळेल त्या वाहनाने नागरिकांच्या सहकार्याने धरणगाव ग्रा.रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून अण्णा महाजन यास मृत घोषित केले त्यामुळे धरणगाव शहरात व विशेष करून संजय नगर भागातील अतिशय मनमिळावू तरुण निघून गेल्या कारणाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अशा वरील स्वरूपाची तक्रार प्रदीप विक्रम पाटील यांनी धरणगाव पोलीस स्टेशन येथे दिली असून पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे.

टीम झुंजार