मुंबई :- धावत्या स्वराज एक्प्रेसमध्ये वॉशरूममध्ये एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर अली आहे, अधिक माहिती अशी कि, धावत्या रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा कपड्यांच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास समोर आली . संबंधित तरुणीसोबत एक व्यक्ती आणि लहान मुलगा बोरीवलीपासून सोबत प्रवास करत होते. पण ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यापासून दोघंही फरार आहेत.
संबंधित तरुणी स्वराज एक्स्प्रेसमधील वॉशरूम कोचमध्ये गेली होती. पण बराच काळ उलटूनही ती परत आली नाही. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता मिळाली नाही. दरम्यान रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाजा उघडला असता, २० वर्षीय तरुणी लटकलेल्या अवस्थेत आढळली आहे.
संबंधित रेल्वे मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरापर्यंत जाणार होती. दरम्यान रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला.
मृत तरुणीचं नावं आरती कुमार….
या गाडीला डहाणू रोड स्थानकात दुपारी १ वाजून १० मिनिटांनी विशेष थांबा देण्यात आला. याठिकाणी तरुणीचा मृतदेह उतरवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली. आरती कुमार असे मृत तरुणीचे नाव असून ती बिहार मधील रहिवाशी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिली.
टॉयलेट मध्ये आढळला मृतदेह…
मृत तरूणी आरतीचा मृतदेह टॉयलेटमध्ये आढळल्यानंतर प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले. त्यानंतर डहाणू रोड स्थानकात ही रेल्वे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.