शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांच्या व जवखेडेसिम चे मा.लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले याच्या पॅनल ला एकतर्फी सत्ता तर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांच्या पॅनलचे सर्वचे सर्व उमेदवार पराभूत .
एरंडोल:- जवखेडेसिम ता एरंडोल येथील विकास सोसायटीचे मतदान दि.4 रोजी घेण्यात आले मतदान संपल्यानंतर दुपारी 4 वाजेपासून जिल्हा परिषद शाळेत च्या सभागृहात मतमोजणी झाली, सुरवातीला महिला राखीव मतदार संघातून सौ अल्काबाई लोटन पाटील, सौ लिलाबाई सुभाष पाटील ह्या प्रचंड बहुमतांनी निवडून आल्या, त्या नंतर विमुक्त भटक्या जाती मतदार संघातून गोसावी मुरलीधर धर्मागिर गोसावी निवडून आले,अनुसूचित जाती मतदार संघातून सोनवणे उत्तम चिंतामण यांचा मोठ्या फरकाने विजय प्राप्त झाला,
इतर मागास प्रवर्गातून प्रेमराज पाटील यांचा विजय झाला,खुल्या कर्जदार/खातेदार मतदार संघातून 1आमले गोपीचंद बळीराम 2 ज्ञानेश्वर सखाराम पाटील 3 हिंमत जयराम चौधरी 4 हिंमत प्रेमराज पाटील 5 यादव माधवराव पाटील 6 कैलास प्रल्हाद पाटील 7अभिमन रामदास पाटील 8 खेमणार रमेश चिंतामण या सर्व उमेदवारांचा मोठया फरकाने एकतर्फी विजय झाला
पॅनल च्या विजयासाठी। शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांच्या व जवखेडेसिम चे मा.लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले यांनी प्रयत्न केले,गावातील सर्व ग्रामस्थांनी आनंद व जल्लोष व्यक्त केला. नवनिर्वाचितसदस्याचे नामदार गुलाबरावजी पाटील आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील जिल्हा बँक संचालक अमोल दादा पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षल दादा माने महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा ताई पाटील
एरंडोल तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष
रमेश महाजन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष हिम्मत पाटील शिवसेना उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर शिवसेना तालुका संघटक राजेंद्र चौधरी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन पंचायत समिती माजी सभापती रोकडे सर युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील शिवसेना उप तालुका प्रमुख रविंद्र चौधरी शिवसेना उप तालुका प्रमुख संजय पाटील शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन युवा सेना शहर प्रमुख अतुल महाजन युवा सेना तालुका समन्वयक कमलेश पाटील आदीनी अभिनंदन केले