
धरणगाव – राजेंद्र वाघ यांजकडून, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा, ठाण्यातील उत्तरसभेत मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील मुद्दा उचलून मशिदींवरील भोंगे उतरवावेच लागतील आणि परवा दिवशी औरंगाबाद येथील सभेत मशिदींवरील भोंगा कढण्यात याव्यात अशी ठाम भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम दिले आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरून मनसेत दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता मनसेला मोठा धक्का बसत आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे. आता खुद्द मनसेमधून राज ठाकरेंच्या भूमिकेला कडवा विरोध होताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पुण्यातील मनसेचे नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष यांनी विरोध दर्शवला होता. यानंतर मनसेच्या मुस्लीम बांधव पदाधिकाऱ्यांमध्ये यावरून नाराजी असल्याचे चित्र राजीनामा सत्रावरून दिसत आहे.
यातच आता धरणगाव मनसेचे मुस्तुफा खान शकील खान यांनी राज ठाकरे यांच्याकडून वारंवार अजान व भोंगा संदर्भात माझ्या व मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याचा अनुषंगाने उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा शहरप्रमुख संदीप फुलझाडे यांच्याकडे दिला असे श्री. खान यांनी निवेदनात नमूद केले आहे.
