मुक्ताईनगर | शहरातील अंबिका ज्वेलर्स या दुकानावर धाडसी दरोडा टाकण्यात आल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. चोरटयांनी सोने-चंदीसह एकूण ३० लाख ऐवज लंपास केला आहे. ही घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत असे की, शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्स या सराफ दुकानात रात्री धाडसी दरोडा घालण्यात आला. आज सकाळी ही बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंबिका ज्वेलर्सचे संचालक अनिल शूरपाटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दुकानात दरोडा पडल्याची माहिती मिळाली. यात सुमारे २५ लाख रूपयांची चांदी तर पाच लाख रूपयांच्या सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकाला माहिती दिली असून पंचनामा करून याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, भर बाजारपेठेत असलेल्या सराफा दुकानातील या धाडसी दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.