झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-पिंप्री बुद्रुक (ता.एरंडोल) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी वसंत नथ्थू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली.अध्यक्षपदासाठी एस.आर.पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी वसंत नथ्थू पाटील यांचेच उमेदवारी अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजू महाजन यांनी जाहीर केले.एस.आर.पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच सभासदांनी जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला.सभेस रवींद्र आत्माराम पाटील,दगडू तुकाराम पाटील,शांताराम कौतिक पाटील,किशोर तोताराम पाटील,हरी बन्सीलाल पाटील,भास्कर बळीराम पाटील,मगन जयराम पाटील,संतोष गंगाराम पाटील,सुमनबाई प्रताप पाटील,सुमनबाई अर्जुन पाटील आदी संचालक उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजू महाजन यांनी काम पाहिले.त्याना सहाय्यक अधिकारी धमाके,संस्थेचे सचिव राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.दरम्यान संचालक मंडळाची यापूर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली होती.एस.आर.पाटील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष असून बाजार समितीचे माजी सभापती आहे.पिंप्री बुदृकाचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच आहेत.सुमारे पंचवीस वर्षांपासून पिंप्री बुद्रुक ग्रामपंचायतीवर त्यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता आहे.
माजी पालकमंत्री गिरीश महाजन,भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर,खासदार उन्मेष पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील,नगराध्यक्ष रमेश परदेशी,आमदार चिमणराव पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन,सामाजिक कार्यकर्ते सुनील पांडुरंग चौधरी, यांचेसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी एस.आर.पाटील,वसंत पाटील यांचे अभिनंदन केले.
सभासदांनी विश्वास दाखवुन सोसायटीची निवडणूक बिनविरोध केली,संचालक मंडळाने माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असून शेतक-यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष एस.आर.पाटील यांनी सांगितले.