व्हाटसअप वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर ‘मेटा’च्या संचालकांनी जाहीर केली असून या घोषणेमुळे वापरकर्त्यांच्या अनेक अडचणी सुटणार असून व्हाटसअप गृप सदस्यांची २५७ ची असलेली मर्यादित संख्यां वाढून ५१२ पर्यंत असणार आहे.त्यामुळे व्हाट्सअपच्या युजर्सकरिता ही मोठी बातमी मानली जात आहे.
मोबाईल मधील महत्वपूर्ण व लोकप्रिय ऍप
प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये व्हाट्सअप नावाचं ऍप असल्याशिवाय परिपूर्णता प्राप्त होतं नसल्यागत आताची परिस्थिती आहे दिवसभरात वेळात वेळ काढून मोबाईल वापरकर्ता आपला वेळ व्हाट्सअपवर घालवतो. मॅसेज करणे, कामाचे फाईल शेअर करणे, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट शेअर करणे अशा अनेक गोष्टी यामाध्यमातून करता येत असल्याने अलीकडच्या काळात व्हाटसअपचे महत्व प्रचंड वाढलेले पाहायला मिळत आहे
असं असलं तरि व्हाट्सअँप वापरणाऱ्या प्रत्येकाला दोन अडचणी नक्की येतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलीही मोठी व्हिडिओ फाईल शेअर करताना येणारी साईजची मर्यादा आणि दुसरी म्हणजे गृप सदस्यांची मर्यादा. मात्र आता व्हाट्सअँप ने गृप सदस्यांची संख्या वाढवत युजर्सला मोठी खुश खबर दिली आहे. कारण आता व्हाट्सअप WhatsApp आपल्या युजर्सला तब्बल 2GB पर्यंतची फाईल शेअर करण्याची सुविधा देणार आहे.
अलीकडेच मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने चॅट लिस्टवर 32 लोकांचा व्हॉइस कॉल आणि एकापेक्षा जास्त डिव्हाइस वर एक खातं वापरण्याची सुविधा दिली होती. यासह अनेक नवीन अपडेट्स करण्याची घोषणा केली आहे
WhatsApp वर मोठ्या साईझच्या फाईल्स शेअर (Large Files Sharing) करता याव्यात अशी वापरकर्त्यांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. WhatsApp वर मोठ्या फाईल्स शेअर करताना यूजर्सना खूप त्रास होतो, मात्र ही समस्या आता संपली आहे. ही अपडेट मिळवण्यासाठी आताच तुमचं WhatsApp अपडेट करा आणि या सुविधेचा फायदा घ्या असं आवाहन कंपनी तर्फे करण्यात आलं आहे.