यावल प्रतिनीधी :- १२/०५/२०२२ यावल तालुक्यातील आमोदा येथील प्रगतशील शेतकरी श्री.उल्हास देविदास पाटील, रा. आमोदा यांच्या शेतामध्ये “नंदी- परम” या मक्याचा प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात यावल तालुक्यातील विविध कृषी विक्रेते तसेच प्रगतशील शेतकरी व महिला कृषी उद्योगातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यात कंपनी अधिकाऱ्यां कडून ग्रामस्थांनी प्रगत शेतकरी श्री.उल्हास पाटील, श्री.उमेश पाटील (पंचायत समिती अध्यक्ष यावल), मा. श्री.सुधीर मोरे (नंदपाल सहकारी दूध डेअरी चैर्मन), सौ.विद्या ताई पाटील(कृषी महिला गट अध्यक्ष), सौ.मनीषा ताई चौधरी (पोखरा गट अध्यक्ष) यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात नंदी सीड कंपनीचे महाराष्ट्र राज्य विभागीय अधिकारी मा. श्री. भूषण देशमुख सर, उत्पादन विकास अधिकारी मा. श्री. अमोल बोरुडे सर व मालेगाव विक्री अधिकारी श्री. जयविरसिंग पाटील आणि पंकज सोनवणे चाळीसगाव तालुका अधिकारी यांनी मक्का उत्पादन वाडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
नंदी सिड्स च्या परम मक्या बद्दल आमोदा गावातील शेतकरी श्री.उल्हास पाटील यांनी त्यांचा अनुभव सांगतांना ते म्हणाले की
” मी नेहमी वेग वेगळे मक्याचे वाण लावत असतो पण या वाणा चा अनुभव मला पाहिलांदाच आला आणि खूप चांगला आला, या “परम” मक्का चे वैशिष्ट्य म्हणजे याचे मोठे व वजनदार कणीस व आकर्षक रंगाचे नारंगी दाणे आणि शेवटी परंत हिरवा राहिला, दुधाळ वाशुसाठी उत्तम असा चारा मिळतो
आणि भरगोस उत्पादन देण्याची क्षमता या वाणात आहे.
अशा प्रकारे नंदी परम मक्या बद्दल शेतकरी व कृषी विक्रेता बंधू यांनी स्वतः पीक पाहणी करून नंदी- परम वाणा बदल प्रशंसा केली व म्हणाले की या सारखा मक्का आम्ही अजून कुठे नाही पहिला आता पुढच्या वेडेस हमखास आमच्या यावल तालुक्यात व अमोदा गावात सर्वत्र आम्ही नंदी सिड्स चा “परम” मक्का च लावणार आहोत अशे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.
धन्यवाद!