दुर्दैव ; मित्रांसोबत खेळणाऱ्या चिमुकल्याला सापाने घेतला चावा.

Spread the love

जालना (भोकरदन ) : – घरासमोर मित्रांसोबत खेळत असताना एका चिमुकल्याचा सााप चावल्ययाने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील भायडी येथे बुधवारी (ता.११) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. रुद्र भरत जंजाळ (वय ८ वर्ष ) असे साप चााललेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तालुक्यातील भायडी येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरीच्या वर्गात शिकणारा रुद्र हा बुधवारी सायंकाळच्या वेळेला नेहमीप्रमाणेच आजी, आजोबा आणि मित्रांसोबत घराजवळील अंगणात खेळत असतांना अचानक त्याला सापाने चावा घेतला.

त्यामुळे त्याला तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, साप विषारी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच सिल्लोडजवळ त्याची प्राणज्योत मालवली.

रुद्र हा अत्यंत हुशार व बोलका असल्याने गावात व शाळेत तो सर्वांचा लाडका होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

टीम झुंजार