लोणार प्रतिनिधी/उध्दव आटोळे :- लोणार तालुक्यातील लोणी नाका येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर तहसीलदार यांनी कारवाई केली आहे
लोणी नाका येथे तहसील कार्यालयाची अवैध रेती वाहतूक तपासणी पथकाने वाहनाची विचारपूस केली असता सदर तिन्ही वाहन चालकाकडे जुना तारखेचा परवाना आढळून आला, त्यामुळे अवैध परवान्यावर रेती वाहतूक होत असल्याची बाब उघडकीस येताच
तहसीलदार सैपन नदाफ यांनी तीनही वाहनाचा पंचनामा करून सदर वाहने तहसील कार्यालयात जप्त केली आहेत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती 14 मे रोजी देण्यात आली आहे.