जळगाव,(प्रतिनिधी): – जळगाव जिल्ह्यातील विनयभंग केल्याच्या घटना काही थांबायचे नाव घेत नसुन.अश्यातच महाविद्यालयातशिक्षण घेणाऱ्या वर्गातील सहकारी ४ विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करत गेल्या चार महिन्यापासून छळ काढत असल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला असून या घटनेने महाविद्यालयात चांगलीच खळबळ उडाली आहे.दरम्यान शरीरसुखाची मागणी करणाऱ्या त्या चारही विदयार्थ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या ४ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल….
देवेंद्र भागवत पाटील (वय २१, रा. नायगाव, ता. यावल), अजय मनोज माळी (वय २०, रा. तळेगाव, ता. जामनेर), कमलेश भटू भांबरे (वय १९, रा. सुराय, ता. शिंदखेडा, जि. धुळे) व अभिषेक रमेश बाविस्कर (वय १९, रा. फर्दापूर, ता. जामनेर) या चार विद्यार्थ्यांविरुद्ध शनिवारी रात्री रामानंद नगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून या चारही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थिनीने पोलिसत दिलेली फिर्याद मध्ये काय म्हटले आहे..
सदर विद्यार्थिनी जळगाव शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्याच वर्गात वरील या 4 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या चारही विद्यार्थ्यांनी शरीरसुखाची मागणी केली. पीडिता मेहुण्याकडे वास्तव्याला असून एका तालुक्याच्या ठिकाणावरून बसने जळगावात शिक्षणासाठी ये-जा करते. ११ जानेवारीपासून तर आतापर्यंत या चारही विद्यार्थ्यांनी पीडितेशी वारंवार अश्लील बोलून शेरेबाजी केली. तसेच त्यानंतर मेहुणे व पतीला घेऊन विद्यार्थिनीने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्या नंतर त्यानुसार चौघांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रत्येकाने वेळोवेळी शरीरसुखाची केली मागणी.
तसेच ज्या मुलाशी लग्न ठरले आहे, त्याच्यापेक्षा मी तुला जास्त सुखात ठेवेन असे बोलून मानसिक त्रासही दिला. त्रास असह्य झाल्याने पीडितेने हा प्रकार मेहुणे व होणाऱ्या पतीला सांगितला. त्या दोघांनी कॉलेजमध्ये येऊन चौघांची समजूत घातली.मात्र तरीही या चार विद्यार्थ्यांनी छळ काढणे आणि शरीर सुखाची मागणी करणे न थांबविल्याने अखेर विद्यार्थिनीने गुन्हा दाखल केला.