सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारिकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न.

Spread the love

सातारा दि. 3 : सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारिकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे आदी उपस्थित होते.

विस्तारित विश्रामगृह साताराच्या वैभवात भर घालेलयावेळी

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सातारा येथे 13 कोटी 12 लाख खर्च करुन विश्रामगृहाचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. 1 व्हीव्हीआयपी कक्ष, 2 व्हीआयपी कक्ष व 5 साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. तसेच मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहेत.

हे विस्तारित विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल.

साताराच्या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधांसाठी 300 कोटीसाताराच्या सैनिक स्कूल हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी प्रत्येक वर्षी 100 कोटी या प्रमाणे 300 कोटी देण्यात येणार आहे. येथे कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही

सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीने करावा. महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसे उभे राहिल यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. तसेच स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करावे. तसेच महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा संस्थेसाठी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळाच्या उभारणीला 12 कोटी 99 लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रयोग शाळेत म्युझियम, व्याख्यान कक्ष, डेमो रुम, विभाग प्रमुखांसाठी कक्ष अशा सुविधा असणार आहेत.

टीम झुंजार