रावेर :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील विटवे शिवारात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलीस हवालदार बापू पाटील यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर ड्रायव्हरने ट्रॅक्टर न थांबवता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर आणून त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांची गुंडगिरी वाढताना दिसतेय.
काय आहे घटना ?
ऐनपुर येथील ट्रॅक्टर ड्रायव्हर प्रविण श्रावण चव्हाण हा शनिवार दि.१४ मे रोजी ११.३० च्या सुमारास विटवे शिवार भोकर डोह तापी नदी पात्रात पातोंडी गावापासुन दोन किलो मीटर अलीकडे वाळुची अवैध वाहतुक करीत होता. यावेळी वीटवा बीट अंमलदार पोहेकॉ. बापु धनराज पाटील यांना आढळुन आला असता पोलीस बापु पाटील यांनी ट्रॉक्टर अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर न थांबवता ड्रायव्हर ने ट्रॅक्टर बापु पाटील यांच्या अंगावर घेऊन यांना धडक दिली.
त्यात बापु पाटील यांच्या डाव्या माडीला व कंबरेला मार लागला असून ते जखमी झाल्याचे बघून ड्रायव्हर ने ट्रॅक्टर घेऊन पलायन केले.
पुढे पातोंडीत ड्रायव्हर आणि त्याच्या दोघ भाऊ सुनिल चव्हाण व राकेश यांना बोलवुन घेतले. व या दोघांनी बापु पाटील यांच्या सोबत हुज्जत घातली व धक्काबुक्की केली. पो.हे.कॉ. २७०६ बापु धनराज पाटील यांनी निभोरा पोलीस स्टेशनला फीर्याद दिली गु.न . ८६/२२ . भा. द. वि.कलम ३०७, ३५३, ३३२, ४२१, ५०४, ५०६, १८४ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. व ट्रॅक्टर ताब्यात घेऊन आरोपी प्रविण श्रावण चव्हाण, सुनिल श्रावण चव्हाण, राकेश श्रावण चव्हाण सर्व राहणार ऐनपूर ता रावेर व ट्रॅक्टर पो. स्टे. मध्ये ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे प्रभारी स.पो.नि. शितल कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर चौधर, स्वप्नील पाटील ईश्वर चव्हाण हे करीत आहेत.