
लोणार/उध्दव आटोळे
लोणार शहरातील दैत्यसूदन मंदिरातील भगवान श्री विष्णू च्या चरणावर आज 16 मार्च रोजी सूर्यप्रकाशाची किरण पडले असून हा एक चमत्कार मानला जात आहे हजारो वर्षांपूर्वी या ठिकाणी भगवान श्रीविष्णु ने अवतार घेऊन राक्षसाला मारल्याची आख्यायिका आहे
त्यासोबतच या ठिकाणावर उल्कापात होऊन सरोवर तयार झाले आहे सदर सरोवराच्या काठावर अखंड जलधारा वाहत आहे याठिकाणी जगभरातून असंख्य पर्यटक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात आज अचानक दैत्यसूदन मंदिरातील भगवान श्री विष्णू च्या चरणावर सूर्यप्रकाशाची किरणे पडलेली पाहायला मिळाली यावेळी उपस्थित रवी जावळे व पुरातत्त्व विभागाचे लेबर गजानन इंगळे यांनी सदर प्रकार कॅमेरा मध्ये कैद केला असून हा एक चमत्कार मानल्या जात आहे. मात्र सदर सूर्यकिरणे ही भगवान श्री विष्णू च्या चरणावर पडल्या याबाबतची संपूर्ण माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाल्या नंतरच स्पष्ट होणार आहे.





