रणमोडवाडी विकासोच्या चेअरमनपदी अँड चंद्रशेखर पवार,व्हॉइस चेअरमनपदी अशोक खंडागळे यांची बिनविरोध निवड.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
अंथुर्णे : ( ता. इंदापूर)
रणमोडवाडी विकास सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेमधून राष्ट्रवादी पुरस्कृत श्री ब्रह्मनाथ शेतकरी परिवर्तन पॅनल ला १३ पैकी १२ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये आज राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल मधून चेअरमन पदी श्री चंद्रशेखर पवार वकील साहेब तर व्हाईस चेअरमन पदी श्री अशोक खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले.
संचालक म्हणून गायकवाड रमेश सोपानराव, पवार अनिल गोरख, येवले अंकुश दगडू, रकटे भाऊसाहेब शिवदास, रणमोडे उदयसिंह पांडुरंग, रणमोडे संतोष तुकाराम, चिंचकर सुभद्रा ज्ञानदेव, रणमोडे वत्सला प्रल्हाद, गोसावी दत्तात्रय तुकाराम, खरात हिरालाल पांडूरंग, या नूतन संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, हार श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून श्री. किशोर रणमोडे पाटील ग्रामपंचायत सदस्य अंथुर्णे, सौरभ ( बबलू ) पवार, अनिकेत (बापू) रणमोडे, गजानन बोंद्रे, सागर रणमोडे, फत्तेसिंह चव्हाण, गोरख खंडागळे, अशोक (बापू) घोलप, सचिन गोसावी, राहुल रणमोडे, बाळू वाघ माजी उपसरपंच अंथुर्णे यांनी काम पाहिले.

टीम झुंजार