एरंडोल येथे बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने निघालेली शोभायात्रा ठरली लक्षवेधी

Spread the love


झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- येथे विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली बाल गोपालांसह नागरिकांनी काढलेल्या शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले होते.


सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा भीम नगर येथे ब्लू बॉईज फाउंडेशन, पंचशील मित्र मंडळ, रमाबाई आंबेडकर नगर, राजे संभाजी ग्रुप तसेंच समस्त बौद्ध समाज बांधव यांच्यावतीने गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,गणेश आहिरे, मार्केट कमिटीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

भरत शिरसाट, कैलास गायकवाड यांनी त्रिशरण पंचशील,बौध्द पूजा सादर केले तसेच जगाला युद्ध नको बुद्धांच्या शांतीचा संदेश हवा या विषयावर माहिती देण्यात आली.

ट्रॅक्टरच्या रथावर गौतम बुद्ध यांची मूर्तीची शोभायात्रेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बाल गोपालांसह नागरिक व महिला भगिनींनी या शोभायात्रेत आपला सहभाग नोंदवला होता अत्यंत शांततेच्या वातावरणात शिस्तीमध्ये भीम नगर म्हसावद नाका, मेनरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मारवाडी गल्ली, अमळनेर दरवाजा, महात्मा फुले पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने ही शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये जगाला युद्ध नको बुद्ध हवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, गौतम बुद्धांचा विजय असो, अशा घोषणा मध्ये ही शोभायात्रा काढण्यात आली.


दरम्यान शहरातील तिन्ही महापुरुषांच्या पुतळ्यास बुद्ध पौर्णिमा उत्सव समितीच्या वतीने माल्यार्पण करण्यात आलेे


ब्लू बॉईज फाउंडेशन यांचेसह समस्त बौद्ध समाज बांधवांनी गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले .

टीम झुंजार