जालना नांदेड समृद्धी महामार्गाची कामे शेतकर्‍यांनी रोखले तहसीलदारला निवेदन.

Spread the love

पूर्णा प्रतिनिधी कलीम :-संपूर्ण मराठवाड्याच्या हिताचा प्रश्न असलेला जालना नांदेड समृद्धी महामार्ग परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातून जात असला तरीही शेतकऱ्यांना किती पटाने जमिनीचा मोबदला मिळणार यासाठी पुर्णा तालुक्‍यात काही शेतकऱ्यांनी दिनांक 3 जानेवारी रोजी या मोजणीस विरोध केला असून यासंदर्भात प्रशासनाकडून कुठलीच आश्वासन दिले जात नाही.

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ला जोड मार्ग म्हणून जालना ते नांदेड हा समृद्धी महामार्ग आहे उपाशी या मार्गावर जालना ते परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 7000 एकर जमीन या मार्गामध्ये अधिग्रहित केली जाणार असून यासंदर्भात राज्य सरकारने यादी सूची जाहीर केली आहे. यादी सचिन दिलेल्या पूर्णा तालुक्यातील शेतकरी जमिनी सध्या संपादित करण्याची मोहीम महसूल विभागाने सुरू केली आहे दिनांक 3 जानेवारी रोजी पूर्णा तहसील कार्यालय पूर्ण तहसीलदार पल्लवी टेमकर तलाठी पाटील यांनी संयुक्त मोजणी तालुक्यातील सर्जापूर येथे करण्यासाठी ते गेले होते परंतु त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या समृद्धी महामार्ग समितीच्यावतीने घ्या मोजणी कामास रोखण्यात आली .

त्यामुळे या समृद्धी महामार्गावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यांना तत्काळ मावेजा किती पटीने देण्यात येणार आहे याची अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात माहिती द्यावी अशी मागणी या ठिकाणी उपस्थित असलेल्या समितीच्या काही सदस्यांनी व्यक्त केलीतहसीलदार नॉटरिचेबलपूर्णा येथील तहसीलदार सध्या प्रशासकीय कामांमध्ये हलगर्जीपणा दिसून येत असून मागील काही दिवसापासून पूर्ण तालुक्यांमध्ये अवैध रेती माफियांची ही जोपासणाऱ्या तहसीलदारांना या मागणी संदर्भात दोन वेळेस फोन केला असता त्यांनी फोन घेण्यास नकार दिला.

त्यामुळे सध्या तहसीलदार नॉटरिचेबल असल्याचे दिसून येत असून संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केले असले तरी या भावना त्यांनी प्रसार माध्यम पुढे मानण्यास नकार दिला दरम्यान या समृद्धी महामार्ग मधील गेलेल्या जमिनी शेतकऱ्यांना पासपोर्ट मारायचा देण्यात यावा या मागणीवर समृद्धी महामार्ग शेतकरी कृती समिती ठाम असल्याचे कृती समितीचे गोविंद घाटोळ संदेश देसाई योगेश थोरात यांनी सांगितले.

टीम झुंजार