बायको नांदायला येत नाही म्हणून तरूणाचे विजेच्या टाॅवरवर चढून आंदोलन..

Spread the love

जुन्नर – (कुरकुंडी ता.संगमनेर) सध्या महाराष्ट्रात वेेगवेगळ्या घटना घडत आहेत अश्यातच जुन्नर येथील युवकाने बायको नांदायला येत नाही म्हणून चक्क टॉवरवर चढून आंदोलन केले. जोपर्यंत पत्नी येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने उपस्थिताना सांगितले. तसेच त्याने दोरखंड ही सोबत नेला होता. केशव काळे (२२ वर्षे) असे या आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या आंदोनलामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. ही घटना आज शुक्रवार (१९ मे) रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. अखेर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी त्याच्या पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आवाहन केल्यानंतर सदर तरुण ४ वाजता टॉवरवरून खाली आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केशव काळे या युवकाचे गोद्रे(जुन्नर) येथील मुलीसोबत डिसेंबर २०२१ मध्ये कुरकुंडी घारगाव येथे विवाह झाला होता. पती-पत्नीमध्ये होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी माहेरी गोद्रे येथे आई वडिलांकडे राहण्यास आली. आज हा युवक तिला सासरी नांदण्याकरीता घेऊन जाण्यास आला असता पत्नीने सोबत येण्यास नकार दिला, त्यानंतर केशव काळे हा युवक थेट टॉवरवर चढला.

याबाबत पोलीस पाटील सुमित लोहोटे यांनी पोलिसांना कल्पना दिली. या तरुणाची बायको नांदायला येत नसल्याने त्याने वेगळीच शक्कल लढवली. त्याने आपली मागणी पूर्ण व्हावी म्हणून थेट पिंपळगाव सिध्दनाथ गावातील पेट्रोल पंपासमोर असलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून बसला. याप्रकाराबाबत केशवच्या सासू-सासरे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता केशवने यापूर्वी देखील गोद्रे गावच्या डोंगरावर चढून उडी मारण्याची धमकी दिली होती. तसेच केशवच्या विरोधात आम्ही तक्रार अर्ज दिले असल्याची माहिती मुलीचे वडील रोहिदास विठ्ठल भोजने यांनी दिली.

टीम झुंजार