जामनेर : – तालुक्यातील हिंगणा येथील एक तरूण बनावट नोटांची छपाई करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला सध्याच्या या धावत्या जगात पैसा कमवून श्रीमंत व्हायचं आहे. मात्र, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात एका तरूणाने चक्क नकली नोटाच छापण्याचा धक्कादायक पराक्रम केला आहे. जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रूक येथील तरुणाचा जामनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उमेश चुडामण राजपूत वय २२ असं अटकेतील संशयितांचं नाव असून त्याच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी प्रिंटर व २०० रुपयांच्या ४५ बनावट नोटा हस्तगत करण्यात आले.
https://www.facebook.com/113192607933883/videos/366568108651582/
तरुणाने युट्यूबवर पाहून नकली नोटा छापण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ पाहून पोलिसही चक्रावले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हिंगणे येथून उमेश राजपूत हा तरूण नकली नोटा छापत होता. त्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. त्यावेळी हिंगणे येथील उमेश राजपूत नाव समोर आले. त्यावेळी पोलिसांनी या संशयितांला ताब्यात घेतले. तसेच अधिक चौकशी केली असता, पोलीसही चक्रावले. उमेश राजपूत हा युट्यूब पाहून नकली नोटा छापत असल्याचे उघड झाले.
जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ
दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या छापल्यात त्याच्याकडून नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद जप्त करण्यात आला आहे. तसेच नकली नोटा तयार करण्यासाठी लागणारे प्रिन्टर ही ताब्यात घेण्यात आला आहे. तर त्याने छापलेल्या 200 च्या 46 नकली नोटा ही हस्तगत करण्यात आल्या आहेत. या घटनेने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.