
चाळीसगाव :- सध्या शारीरिक अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच चाळीसगाव तालुक्यातिल एका गावातील संतापजनक बातमी समोर अली आहे. ती म्हणजे तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती अल्पवयीन मुलीशी गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना..?
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. संशयिताने तब्बल साडे सहा महिने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. या प्रकारातून ती मुलगी गर्भवती झाल्याचा गंभीर प्रकार २१ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी बु. (मजरे) येथील रहिवासी असलेला भगवान उर्फ भगा कैलास सोनवणे, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पिडीतेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम- ३७६ (२) (एन), ३६३, ३६६ (ए), पोस्को अंतर्गत ४, ६, ८, १२ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.





