अवैध मुरूम उत्खनन व वाहतुक प्रकरणी तात्काळ दंडात्मक कार्यवाही करावी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी काढला आदेश

Spread the love
संग्रहित छायाचित्र गुगल

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- व धरणगाव
तालुक्यातील गावांमध्ये विनापरवाना मुरूम व उत्खनन प्रचंड प्रमाणात होत आहे म्हणून प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल धरणगाव तहसीलदार यांना अवैध उत्खनन करणार्‍यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी असा आदेश काढण्यात आला आहे.
प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे की पोखरी,विखरण EC मंजुरी नसलेल्या गटातून परवाना नसताना अवैध उत्खनन व वाहतुक बाबत सोशल मिडीया वर फ्राईम इन्वेस्टीगेशन न्यूज नावाने तसेच काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर तक्रार झालेल्या आहेत.

तसेच एरंडोल शिवार, गालापूर परिसर, उमरदे, खेडी-कढोली परिसर व धरणगाव तालुक्यात बांभारी, पोखरी परिसर येथे EC मंजूरी नसलेल्या गटातून अवैध उत्खनन होत आहे अशा तक्रारी दूरध्वनीवरूनही प्राप्त होत आहेत.तरी आपल्या तालुक्यात आजच पथके पाठवून कोठे-कोठे अवैध उत्खनन होत आहे / झाले आहे ते निश्चित करून भूमी अभिलेख विभागाकडून GPS मोजणी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमाप करून असे करणान्याविरुध्द दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. याबाबत आपण काय नियोजन केले आहे याचा अहवाल तात्काळ प्रांताधिकारी कार्यालयाला सादर करावा.

तर तहसिलदारांना धरणार जबाबदार

स्टोनक्रशरचारक यांची दर महिन्याला तपासणी तहसिलदार करत नाहीत. त्यांचेकडे आवश्यक त्या
परवानरया व कागदोपत्री पुर्तता नसतानाही, त्यांचे वाहनांना वाहतुक पास नसतानाही संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार काहीही कार्यवाही करत नसल्याचे मागेही मी आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहे. तरी या दृष्टीकोनातून कडक तपासणी नियोजन होणे आवश्यक आहे.

दि. २५/०५/२०२२ पूर्वी सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्यास / पंचनामा-नोटीस बजावणी मोजमाप अशी कार्यवाही न झाल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर व संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांचेवर निश्चित करून शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्यात येईल. आता लखो कळवून कार्यवाही न झाल्यास भविष्यात कायदेशीर पंचप्रसंग किंवा शासनाचा महसूल बुडल्याचे प्रकरण उद्भवल्यास तहसिलदार यांना जबाबदार धरण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे म्हटले आहे.

टीम झुंजार