
औरंगाबाद : – सध्या औरंगाबाद मध्ये मागिल तिनं ,चार दिवसा पासून वेगवेगळ्या घटनानि औरंगाबाद हादरुन गेले आहे.अश्यातच औरंगाबादेतील पुंडलिकनगरमध्ये गल्ली नं. ४ मधील हनुमान मंदिर शेजारीच राहणाऱ्या श्यामसुंदर हिरालाल कळंत्री (५५) व किरण श्यामसुंदर (४१) या दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना समोर आलीय. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. फॉरेन्सिक लॅबचेही पथक घटनास्थळावर आले आहे. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली आहे.
हत्या तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. परिसरात दुर्गंधी सुटला आहे. श्यामसुंदर कळंत्री यांचा राहात्या घराजवळच रेडिमेड कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा घरातून गायब आहे. मारेकरी घरातीलच असण्याचा संशय बळावला आहे.





