मुंबई : – शास्त्रात पूजापाठ करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न राहातं. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकाळी आणि संध्याकाळी केली जाणारी पूजा आणि त्याचे नियम वेगवेगळे आहेत. तुम्ही जर हे नियम पाळत नसाल तर नुकसान होऊ शकतं.
रोज पूजा करताना तुम्ही या गोष्टी कधीच विसरू नका. चुकून जर असं तुम्ही करत असाल तर आजच ते टाळा. दोन्ही वेळी पूजा करण्याचे नियम वेगवेगळे आहेत. सूर्योदयापूर्वी जेवढ्या लवकर पूजा होईल तेवढा त्याचा फायदा अधिक असतो.
रात्र होण्याआधी संघ्याकाळची पूजा करायला हवी. रात्री पूजा करू नये असं सांगितलं जातं. म्हणून तर तिन्ही सांजेला घरोघरी दिवे लावले जातात. आजही अनेक घरांसमोर तिन्ही सांजेला दिवे लावण्याची परंपरा कायम आहे.
संध्याकाळी पूजा करताना तुम्ही देवाला फूल अर्पण करू शकता. मात्र ती फूल संध्याकाळी तोडून आणलेली नसावीत. ती फुलं सकाळी तोडून आणलेली हवीत.
नारायणाच्या पूजेत तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुम्ही तुळस अर्पण करणार असाल तर त्या तुळशी सकाळी तोडून ठेवायला हव्यात. संध्याकाळी तुळशीची पान तोडून ती देवाला अर्पण करू नयेत.
पूजेच्या दोन्ही वेळी दिवा लावायला हवा. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. तुळशीसमोर दिवा लावावा. त्यामुळे घरातील समस्या दूर होतात. सुख-समृद्धी घरात नांदते.
तुम्ही जर सूर्यदेवाची पूजा करत असाल तर तो दिवसाच करावा. सूर्यास्तानंतर करू नये. सूर्याची सकाळी लवकर पूजा करणं केव्हाही चांगलं आणि लाभदायी मानलं जातं.
गायत्री मंत्र सूर्यास्तानंतर ऐकू नये. सकाळी गायत्री मंत्र म्हटल्याने त्याचा फायदा चांगला होतो. संध्याकाळी आरती करताना घंटा वाजवून करावी. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
पूजा आणि दिवा शांत झाल्यानंतर रात्री देवाऱ्यातील फूल काढून बाजूला ठेवावीत आणि देवाऱ्याला पडदा लावावा. हा पडदा सकाळी उघडावा. एकदा पडदा लावला की तो मध्ये उघडू नये.