
झुंजार । प्रतिनिधी
पारोळा :- येथील लालबाग परिसरातील 27 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 23/5 2022 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की पारोळा शहरातील लालबाग परिसरात जितेंद्र हिम्मत पाटील हे आपली पत्नी सुनीता जितेंद्र पाटील ह्या आपल्या दोन मुलांसह राहतात.
23 मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास विवाहिता सुनिता जितेंद्र पाटील वय 27 वर्ष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पती जितेंद्र पाटील यांनी विवाहितेच्या आतेभाऊ तसेच विवाहितेचे आई-वडील यांना फोन करून सांगितले की तुम्ही तात्काळ पारोळा येथे या सुनीताने गळफास घेतलेला आहे म्हणून आतेभाऊ आनंदा पाटील आत्या लताबाई पाटील यांचे सह नातेवाईक पारोळा येथे आले यांनी सुनिता पाटील यांना तात्काळ खाली उतरून कुटीर रुग्णालय येथे नेण्यात आले
त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस स्थानकात आनंदा दत्तात्रय पाटील राहणार शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली जयवंत पाटील हे पोलीस तपास करीत आहेत.
लहान दोन गोंडस मुले असलेल्या विवाहितेने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.