धक्कादायक ; लग्नात गात असतानाच गायिका अचानक खाली कोसळली; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Spread the love

परभणी : – मागणी काही दिवसांपूर्वी लग्न समारंभात लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचत असताना एक तरुण अचानक बेशुद्ध झाला आणि जमीनीवर पडला. आणि त्याच्य मृत्यू झाला ति घटना ताजी असतानाच परभणी मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस असून मोठ्या प्रमाणात लग्न संमारंभ साजरे केले जात आहेत.जवळपास दोन वर्षांनंतर कोरोना सर्व कोरोना निर्बंध सरकारने हटवल्यानंतर सुरु झालेली ही लग्नसराई आहे. त्यामुळे मोठ्या जल्लोषात लग्न समारंभ साजरे करण्याकडे नागरिकांचा कल आहे. आता लग्न मोठं करायचं म्हंटलं की लग्नात, डी.जे, बँड, बँजो आणले जातात. मात्र, याच लग्न समारंभासाठी मागवलेल्या बँड पथकामध्ये गाणं म्हणत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीतून समोर आली आहे. ही महिला गाणं गात असताना कोसळल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

सदरची घटना परभणी जिल्ह्यातील असून ती मागील शुक्रवारी घडली आहे. एका लग्नसोहळ्यात गाणं म्हणत असतांना हृदयविकारचा तीव्र झटका आल्याने होमगार्ड महिलेचा मृत्यू झाला. संगीता गव्हाणे अस मृत महिलेचा नाव आहे. संगीता या लग्नातील बँडमध्ये गाणं गात होत्या त्यावेळी त्या अचानाक खाली पडताना व्हिडीओमध्ये दिसतं आहेत. त्या खाली कोसळतानाचा सर्व प्रकार एका कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या घटनेनंतर संगिता यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

टीम झुंजार