जळगाव : – लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. याचा प्रत्यय नुकताच जळगावात आला. काही दिवसांपूर्वी बिहारमधील भागलपूरमध्ये पार पडलेला एक विवाह सोहळा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता. कारण या विवाहामध्ये नवरदेव 36 इंच उंचीचा तर त्याची होणारी पत्नी केवळ 34 इंच उंचीची तरुणी होती. दोघांनी परस्पर संमतीने सात फेरे घेत साताजन्माच्या बंधनात बांधले गेले. असाच एक विवाह नुकताच जळगावमध्ये पार पडला. संदीप आणि उज्ज्वला यांचे थाटामाटात लग्न लावून देण्यात आले. विशेष म्हणजे या दोघांची उंची 36 आणि 31 इंच अशी आहे. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आणि अनेकांनी या लग्नाला ‘रब ने बना दी जोडी’ असं म्हटलंय.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. याचा प्रत्यय नुकताच जळगावात आला. संदीप सपकाळे हा 36 इंच उंचीचा तर नववधू उज्ज्वला ही 31 इंच उंचीची आहे. या लग्नाला विनाआमंत्रण अनेक लोक उपस्थित राहिल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी माहिती दिली आहे. कमी उंचीच्या या दोघांचा विवाह अगदी थाटामात पार पडला.
काही शारीरिक कमतरता असलेल्या मुलांचे लग्न कसे होणार याची त्यांच्या पालकांना सतत चिंता सतावत असते. शिवाय अशा लोकांना त्यांच्या सामान्य जीवनाची काळजी वाटते. पण, शेवटी ज्याचे त्याचे नशीब कसे असेल आणि ते कधी बदलेले हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार संदीर आणि उज्ज्वलाबाबतीत घडले. कमी उंचीच्या या दोघांचा विवाह पार पडल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.असे म्हटले जाते की, पृथ्वीतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जोडी देव स्वर्गातूनच बनवून पाठवत असतो. ही म्हण या लग्नामुळे पुन्हा एकदा प्रत्ययास आली आहे.