विवाहाचे आमिष दाखवून वर पित्याची एका लाखांत फसवणूक,वधूसह दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
मुलाच्या लग्नासाठी नियोजित वधू दाखवून वर पित्याकडून एक लाख रुपये रोख घेऊन नियोजित वधू व अन्य दोघांनी पळ काढल्याची घटना गुरुवारी घडली वर पित्याची एक लाख रुपयांची फसवणूक झाल्यामुळे नियोजित वधू व अन्य दोघा मध्यस्थ यांच्याविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की गांधीपूरा भागातील रहिवासी तथा पालिकेचे निवृत्त वसुली अधिकारी रामदास चौधरी यांचा मोठा मुलगा दिपक याचा विवाह करण्याच्या दृष्टीने मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू होता. रामदास चौधरी यांना पारोळा येथील वत्सलाबाई तुकाराम चौधरी या विवाह जुळवण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली 10 एप्रिल 2022 रोजी रामदास चौधरी यांनी पारोळा येथील वत्सलाबाई चौधरी यांची भेट घेऊन मुलगा दीपक याच्यासाठी मुलगी असल्यास माहिती द्यावी असे सांगितले. वत्सलाबाई चौधरी यांनी दीपक याच्यासाठी मुलगी दाखवून देईल तसेच त्याच्या विवाहदेखील होईल मात्र त्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.

मात्र रामदास चौधरी यांनी वत्सलाबाई यांना 2 लाख रुपयां ऐवजी एक लाख 60 हजार रुपये देऊ शकतो असे सांगितले त्यानंतर वत्सलाबाई चौधरी यांनी रामदास चौधरी यांना फोन करून 19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया याठिकाणी मुलगी पहाण्यासाठी जाऊ असे सांगितले 19 एप्रिल रोजी रामदास चौधरी यांच्या पत्नी, मुलगा व मोठे जावई, मेव्हणे व वत्सलाबाई चौधरी असे सर्वजण खाजगी वाहनाने धामणेवाडा तालुका तिरोडा जि गोंदिया या ठिकाणी गेले वत्सलाबाई चौधरी यांनी पंचम भैयालाल नगरे यांचे घरी नेले त्याठिकाणी नियोजित वधू अपेक्षा हिला पाहिल्यानंतर मुलगा मुलगी ची पसंती झाल्यानंतर धार्मिक विधी करण्यात आला

8 मे रोजी पंचम नगरे व अन्य 5 ते 6 जण एरंडोल येथे आले त्याच दिवशी कार्यक्रम करून वत्सलाबाई चौधरी यांना रामदास चौधरी यांनी एक लाख रुपये रोख दिले व विवाह झाल्यानंतर उर्वरित 60 हजार रुपये देण्याचे ठरले सर्वबोली बंधन झाल्यानंतर 25 मे 2022 रोजी विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले.19 मे रोजी वरपिता रामदास चौधरी हे मोठे जावई गोपाल चौधरी यांचेसह धामणेवाडा येथे गेले असता पंचम नगरे यांच्या पत्नी एकट्याच घरी होत्या त्यांनी पंचम नगरे व नियोजित वधू अपेक्षा ही नातेवाईकांकडे विवाह असल्यामुळे बाहेरगावी गेले असल्याचे सांगितले. मुलाचा विवाह ठरला म्हणून रामदास चौधरी व त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण होते.

दीपक याच्या विवाहसाठी रामदास चौधरी त्यांच्या पत्नी सुशीलाबाई चौधरी वर दीपक चौधरी नथ्यू चौधरी लग्नासाठी तिरोडा येथे आले.24 मे रोजी रामदास चौधरी, गोपाल चौधरी, व नथ्यू चौधरी धामणेवाडा येथे पंचम नगरे यांच्या घरी गेले असता त्याठिकाणी कोणीही आढळून आले नाही रामदास चौधरी यांनी आजूबाजूला चौकशी केल्यानंतर या ठिकाणी पंचम नगरे यांना अपेक्षा नावाची कोणतीही भाची नाही असे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर रामदास चौधरी यांनी पंचम नगरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर वत्सलाबाई चौधरी यांचेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली वत्सला बाई चौधरी यांचेकडे एक लाख रुपयाची मागणी केली असता तिने पैसे देण्यास नकार देऊन धमकी दिली. रामदास चौधरी यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी. वत्सलाबाई तुकाराम चौधरी राहणार पारोळा पंचम भैयालाल नगरे धामणेवाडा तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया, अपेक्षा सुरेश परघरमोर राहणार वाडी नागपुर यांचे विरोधात पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
या कटामध्ये तळई ता एरंडोल येथील एक खाजगी वाहनचालकाच्या देखील समावेश असून यापूर्वी देखील त्याच्या मध्यस्थीने अनेकांची फसवणूक झाल्याचे समजते

टीम झुंजार