समाजमन सुन्न करणारी घटना : पत्नीच्या मृत्यूनंतर आधार गेल्याने पतीची गळफास घेत आत्महत्या ; एकाचवेळी निघाली पती-पत्नीची अंत्ययात्रा.

Spread the love

पाचोरा :- शहरातील जारगाव परिसरातील हनुमान नगरातील रहिवासी तसेच लोकांच्या घरी धुणीभांडी करून पतीसह संसाराचा गाडा ओढणाऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कोणाचाही आधार न उरल्याने पतीने चिठ्ठी लिहून घरातच गळफास घेत आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मात्र शुक्रवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. मृत दापत्यावर येथील स्मशानभूमीत शुक्रवारी एकाचवेळी अंत्यसंस्क करण्यात आले.

विष्णू पाटील हे हनुमान नगरातील दिगंबर रामदास अहिरे यांच्या घरात गत तीन-चार वर्षांपासून भाड्याने राहत होते, शुक्रवारी सकाळी ८ वाजता घरमालक अहिरे यांनी टाकीत पाणी भरण्यासाठी विजेची पंप सुरू केला. टाकी भरल्यानंतर विष्णू पाटील यांना नळ बंद करण्यासाठी आवाज दिला. मात्र आवाज देवूनही विष्णू पाटील बाहेर न आल्याने ते कुठे आहेत, याचा त्यांच्या घरात जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता विष्णू पाटील हे गळफास घेतलेल्या स्थितीत तर किरणबाई अंथरुणावर मृतावस्थेत आढळून आल्या. अहिरे यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.

पत्नी किरणबाई हिचे निधन झाल्याने विष्णू पाटील यांना आधार न उरल्याने त्यांनी जीवन संपवण्याचा विचार केला होता. गळफास घेण्याआधी त्यांनी चिठ्ठी लिहिली. माझी पत्नीचा मृत्यू झाल्याने मला जीवनात आता कोणाचाही आधार उरलेला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. आमचे अंत्यसंस्कार कुणीतरी करावेत. अन्यथा नगरपालिकेच्या लोकांना अंत्यसंस्कार करण्यास सांगावे, अशा आशयाचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना घरात खुर्चीवर आढळून आली.

अशी घडली घटना

मूळचे नगरदेवळा येथील रहिवासी असलेले विष्णू नामदेव पाटील (भामरे) (६५) हे अनेक वर्षांपासून गवंडी काम करत चरितार्थ चालवत होते. कालांतराने वय वाढल्याने अंगात काम करण्याची ताकद उरली नाही. त्यांना मूलबाळ नसल्याने पत्नी किरणबाई विष्णू पाटील (६०) धुणीभांडी करत. रोजी थकलेल्या किरणचाई दुपारी झोपल्या चार वाजता विष्णू पाटील यांनी पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्या मृतावस्थेत आढळल्या. यामुळे पती विष्णू पाटील खचले जीवन जगण्याचा आधारच संपल्याने त्यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर काही वेळात गळफास घेत जीवनयात्रा संपवली.

भाड्याच्या घरात वास्तव्य

विष्णू पाटील हे हनुमान नगरातील दिगंबर रामदास अहिरे यांच्या घरात गत तीन-चार वर्षापासून भाड्याने राहत होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजता घरमालक अहिरे यांनी टाकीत पाणी भरण्यासाठी विजेची पंप सुरू केला. टाकी भरल्यानंतर विष्णु पाटील यांना नळ बंद करण्यासाठी आवाज दिला. मात्र आवाज देवूनही विष्णू पाटील बाहेर न आल्याने ते कुठे आहेत, याचा त्यांच्या घरात जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता विष्णू पाटील हे गळफास घेतलेल्या स्थितीत तर किरणबाई अंथरुणावर मृतावस्थेत आढळून आल्या. अहिरे यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.

विष्णू पाटील यांच्या चिठ्ठीद्वारे झाला उलगड

पत्नी किरणवाई हिचे निधन झाल्याने विष्ण पाटील यांना आधार न तरल्याने त्यांनी जी संपवण्याचा विचार केला होता. गळफास घेण्या आधी त्यांनी चिठ्ठी लिहिली. माझी पत्नीचा मृत्यू झाल्याने मला जीवनात आर कोणाचाही आधार उरलेला नाही. त्यामुळे आत्महत्या करत आहे. आमचे अंत्यसंस् कुणीतरी करावेत. अन्यथा नगरपालिके लोकांना अंत्यसंस्कार करण्यास सांगावे आशयाचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलि घरात खुर्चीवर आढळून आली.

पाचोऱ्यात हळहळ…

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. विष्णू पाटील यांचे भाऊ व चुलत भाऊ यांच्या वतीने येथील स्मशानभूमीत विष्णू पाटील व त्यांच्या पत्नी किरणबाई यांच्यावर एकाच वेळी अंथसंस्कार करण्यात आले. दरम्या या घटनेने समाजमन सुन्न झाले असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

टीम झुंजार