
लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- उल्कानगरी लोणार येथे गुलमोहोराच्या झाडाची एक मोठी फांदी खाली पडल्याने धारातीर्थ गेट जवळ नगरपालिकेने मोठा गाजाबाजा करीत लावलेला I LOVE LONAR सेल्फी पॉइंट तुटला आहे तसेच वन विभागाचा माहिती फलक लावलेला आहे तो फलक सुद्धा झाडाच्या फांदी मुळे वाकला तरीसुद्धा संबंधित विभाग गार झोपेतच याबाबत सविस्तर वृत्त असे की, जागतिक कीर्ती प्राप्त लोणार सरोवर येथील धारातीर्थ मुख्य गेटच्या जवळ उजव्या बाजूने टेकड्यावर असलेल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या कंपाउंड वॉलच्या भिंतीला लागून मोठे गुलमोहराचे झाड आहे. सदर झाडाची एक मोठी फांदी काल दिनांक २७ मे रोजी रात्री वाऱ्यामुळे अचानक पडल्याने धारातीर्थ मुख्य गेटजवळ नगरपालिकेने धारातीर्थ येथे येणाऱ्या पर्यटकांना सेल्फी काढण्या करीता आय लव लोणार या नावाचा आकर्षक सेल्फी पॉइंट मोठ्या थाटामाटात उभारलेला आहे. प्रत्यक्षात सदर पडलेल्या झाडाची पाहणी प्रतिनिधी यांनी दिनांक २८ मे रोजी दुपारी चार वाजे दरम्यान पाहणी केली असता अद्याप पर्यंत सदर झाडाची फांदी, नगरपालिकेचा आय लव लोणारचा सेल्फी पॉइंट तसेच वन विभागाचा वाकलेला बोर्ड रात्रीपासून जसाच्या तसाच अवस्थेत असल्याने दिनांक 28 मे रोजी धारातीर्थ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सदर झाडाची फांदी, आय लव लोणारचा अस्ताव्यस्त झालेला सेल्फी पॉइंट व वन विभागाचे वाकलेले बोर्ड सुद्धा पाहावयास मिळाला आहे. सदर झाडाची फांदी रात्री पडल्यामुळे काही करता येत नाही परंतु आज सकाळपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत म्हणजेच अंदाजे 9 घंटे वेळ असताना सुद्धा पडलेली झाडाची फांदी, आय लव लोणार सेल्फी पॉइंट व वन विभागाचा वाकलेला बोर्ड काढण्यासाठी किंवा तो दुरुस्त करण्यासाठी नगरपालिका तसेच वन विभागाकडे वेळ नाही का अशी पडलेली अवस्था योग्य आहे का ? यामुळे लोणार सरोवराचे नाव खराब होत नाही का ? तसेच सदरील झाडाची फांदी धारातीर्थ मुख्य गेट समोरील गाड्या पार्किंग लावण्याच्या जागेवर असताना तसेच मुख्य धारातीर्थ गेटवर पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी ड्युटीवर असतांना सुद्धा सदर फांदी उचलणे गरजेचे नाही का ? सदर पडलेल्या फांदी मुळे पर्यटकांना वाहने लावण्यास सुद्धा अडचण झाली आहे.
परिस्थिती असताना सुद्धा सदर झाडाची फांदी उचलण्यास सांगणार कोण साहेबांचा साहेब कोण ?
सदर बाबही पुरातत्त्व विभाग वन विभाग नगरपालिका विभाग या तीन विभागाच्या अधिनस्त असतांना सुद्धा एकाही विभागाने दुपारी चार वाजले तरी सुद्धा फांदी उचलणे गरजेचे समजले नाही. त्यामुळे धारातीर्थ मुख्य गेटजवळ पडलेली फांदी, नगरपालिकेने लावलेले आय लव लोणार सेल्फी पॉइंट,व वन विभागाचा वाकलेला बोर्ड हा अजुन किती दिवस असाच राहणार अशी एक ना अनेक चर्चा धारातीर्थ परिसरातील नागरिक व पर्यटक करीत आहे. यावरुन मात्र सबंधित विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एव्हढे मात्र खरे!





